Friday, February 13, 2026

'प्रेमा' मागचे विज्ञान



'प्रेमा' मागचे विज्ञान सायकोफार्माकोलॉजी (२०१२) च्या एका संदर्भ ग्रंथात जेव्हा सामाजिक साहचर्यासोबत वागणूकीचा अभ्यास केला तेव्हा असे आढळले की एका व्यत्तीस मिळत असलेल्या उपयुक्त प्रतिसादामुळे ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये गुंतत जाते. आपल्या शरीरात प्रेमाची भावना निर्माण करणारी वस्तुतः एक रासायनिक श्रृंखला आहे जी मनावर मात करून प्रेमाची अनुभूती देते. खरे तर प्रेमात पडणे हे निसर्गाने निर्माण केलेला एक सुंदर खेळ आहे, आपण या नैसर्गिक्घटने समोर हतबल असतो. एक वैज्ञानिक शोधात आर्थर अरुण यांनी असे दाखवले की एखाद्या व्यक्तीच्या प्रेम भावनेत अडकण्यासाठी त्याला किंवा तिला केवळ १.५ ते ४ मिनिटांचा अवधी लागतो. यात ५५ % भाग शारीरिक हालचालींचा असतो. म्हणजे आपला मेंदू समोरच्या व्यक्तीच्या शारीरिक हालचालींवरून ठरवतो की त्याला प्रेमाच्या खाणाखुणा मिळत आहेत का? प्रेमात पडण्याच्या निर्णयापैकी ३८% सहभाग हा समोरच्या व्यत्तीच्या आवाजाचा असतो. संवाद, आवाज, त्यातील चढउतार, वारंवारता यावरून ते ठरते. प्रियकराचेप्रेमाने भरलेले वाक्य व सूचक शब्द यांचा केवळ ७ % सहभाग असतो. प्रेमात पडण्याचे तीन प्रमुख टप्पे आहेत. नुकत्याच एक अभ्यासात, प्रेमामागील विज्ञान या विषयावर अमेरिकेतील 'रूटगर्स' विद्यापीठात संशोधन करण्यात आले. त्यात असे निदर्शनास आले की प्रेमात पडण्याचे तीन प्रमुख टप्पे आहेत. जसे वासना, आर्क्सण, आणि जिव्हाळा. यातील प्रत्येक टप्यात शरीरात वेगवेगळ्या रसायनिक प्रक्रियांचा सहभाग आहे. मुख्यत्वे मेंदूत. या सोबतच शरीरातील वेगवेगळ्या संप्रेरकांचाही या तिन्ही अवस्था शरीरात उत्पन्न करण्यसाठी सहकार्य करतात. प्रथम टप्पा 'वासना' (लालसा), ही प्रेमात पडण्याची सर्वात पाहिली पायरी. जेव्हा आपण लालसेच्या अवस्थेमध्ये असतो, तेव्हा आपण प्रिय व्यत्तीक्डे शारीरिकदृष्ट्या आकर्षित होतो. तिच्या भूलवण्यास आपण समर्पित होतो किंवा तिला बहकावण्याची आपली इच्छा असते. वासना सर्व प्राणीमात्रांमध्ये आढळते. आपल्या जनुकाचा प्रसार करण्यासाठी भागीदार शोधण्याकरीता मूलभूत प्रयत्नांचा एक भाग असू शक्ते. पण वासना ही प्रेमापेक्षा भिन्न आहे. या वासनेच्या भावनेची उत्पत्ती ही मूलतः शरीरातील काम संप्रेरकामुळे (हार्मोन्स) होते. 'ईस्ट्रोजेन' हे स्त्रीच्या आणि 'टेस्टेस्टेरोन 'हे पुरुषांच्या शरीरातील कामवासना उत्पन्न करणारे संप्रेरक आहे, यांचे प्रमाण दोघांमध्ये समप्रमाणात असते व हे कामवासनेची मेंदूत निर्मिती करतात. माणसामध्ये हे हॉर्मोन टोचून त्यांच्यात आपण तात्पुरत्या स्वरूपात प्रेमाची लालसा उत्पन्न करु शक्तो. मेंदूतील भावनांचा समतोल साधणारे केंद्र म्हणजे 'लिम्बिक संस्था. या प्रेमातील वासनेत लिम्बिक संस्थेद्वारे मानसिक ताणतणाव घालवण्याची आणि शरीरस्वास्थ उत्तम राखण्याची क्षमता असते. या सोबतच प्रेम वासना आणि यातून उत्पन्न होणारे सुख मानववंशवृद्धीचे काम सुनिश्चितपणे करते. मिलन ही एक वेगळीच परस्परसंबंधित प्रक्रिया आहे जी दोघांमध्ये आकर्षण निर्माण करते. प्रेम संपादित करण्याचा द्वितीय टप्पा म्हणजे परस्परातील आर्क्सण. हा व्यक्तीच्या जीवनातील एक अतिशय सुंदर काळ असतो. या अवस्थेतव्यत्तीस प्रेमाची अनुभूती होण्यास प्रारंभ होतो. एखाद्याला आकर्षित केल्या बद्दलच्या त्याच्या किंवा तिच्या अधीरतेमुळे उत्साह निर्माण होतो, आणि फक्त त्या विशिष्ट व्यक्तीबद्दलच विचार करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. वैज्ञानिक्दृष्ट्याया अभ्यासातून असे निष्र्क्स काढले गेले आहेत की, आर्क्सणांच्या आणखी तीन उप-पायऱ्या आहेत ज्यात त्याच्या किंवा तिच्या व्यत्क्तिमत्त्वात मोठे बदल घडवून आणले जातात. आकर्षण तीन उप-टप्प्यात एड्रेनालीन, डोपमाईन आणि सेरोटोनिन ह्या त्या तीन उप-पायऱ्या आहेत. एड्रेनालीन शास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की एखाद्याच्या आर्क्सणाच्या प्रारंभिक लक्षणांमध्ये ताणास प्रतिसाद देणे, मुळवृत्तीत प्रतिक्रिया देणे आणि एड्रेनालीन व कार्टीसोल यांचे प्रमाण वाढणेया गोष्टींचा समावेश आहे. या अभ्यासात हे दिसून आले की जर एखादी व्यक्ती प्रेमात पडली तर ती कमी क्त्रिां जास्त प्रमाणात वरील तीन लक्षणे दाखवते. शिवायआर्क्सण हा एक आनंददायक प्रभाव आहे, या मुळे व्यक्तिमत्वात थोडे बदल होतात जे नैसर्गिक पण सकारात्मक असतात. या मुळेच जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर येतात तेव्हा तुमची संवेदना हरपते, हृदय जोरातधडधडते, जीभकोरडी पडते. डोपामाईन या सैद्धांतिक संशोधनाची सत्यता पडताळून बघण्यासाठी काही शारीरिक प्रयोग करण्यात आले. आकंठ प्रेमात बुडालेल्या काही जोडप्यांची FMRIs या वैद्यकीय परीक्षणाच्या यंत्रावर मेंदुची पाहणी केली. यातून तयार झालेल्या आलेखातून खरोखरच धक्कादायक माहिती समोर आली, त्या दोन्ही स्त्री पुरुषाच्या मेंदूत डोपामाईनया चेतापारेक्षकाचे (neurotransmitter) मोठ्या प्रमाणात स्त्रावण झाले होते. या रसायनामुळे पूर्ण शरीरात एक आनंदाची भावना उत्तेजित करते. ही माहिती समोर आल्यानंतर वैज्ञानिकानी त्याचे वर्णन असे केले की, जणू काही या जोडप्याने कोकेन सारखी काहीतरी नशाच केली असावी. डोपामाईन हे एक नैसर्गिक उत्तेजक आहे जे आपल्याला अत्यानंद प्रदान करते. तपासणी नंतर त्या जोडप्याने कबुल केले कीत्यांना खरच प्रेमात पडल्यापासून अशीच अनुभूती होत आहे. यात प्रामुख्याने शरीरात खूप शक्ती निर्माण झाल्यासारखे वाटते, लक्ष पूर्वीपेक्षा अधिक केंद्रित होते, लाक्षणिक्रीत्या भूक कमी होते, झोप कमी होते, 'सेरेटोनीन' हेसुद्धा प्रेमातील उत्तेजक्ता वाढवणारे रसायन आहे. हा पदार्थ मुळात तुमचे लक्ष आणि मन केवळ त्या प्रिय व्यत्क्तीबद्दलच विचार करायला भाग पाडते. जणूकाही हेच मनाचे एकमेव उदिष्ट होऊन बसते. प्रेमांत असलेल्या स्त्री पुरुषांमध्ये या सेरेटोनीन नामक रसायनाचे प्रमाण वेगवेगळे असते. प्रेमात पडलेल्या पुरुषांमध्ये याचे प्रमाण कमी असते, पण स्त्रियांमध्ये मात्र ते जास्त प्रमाणात असतात. प्रेमात पडलेल्या लोकांचे दिवसभरातील ६५% विचार हे केवळ त्या प्रिय व्यक्तीबद्दल असल्याचे एक पाहणीत आढळून आले आहे. मानवी जीवनव्यवहारातील गूढ भावनेला आपण केत्रळ प्रेम हे नाव देऊन विसरून जातो. पण ते एक असे गुंतागुंतीचे रसायन आहे जे व्यक्तीच्या वागण्या बोलण्यावर परिणाम करून, या भावनेत त्याला समर्पित करून गुंतून ठेवते. विज्ञान खूप पूर्वीपासून प्रेम भावनेचा मुलभूत घटनाक्रम शोधून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या विविध प्रयोगांती हाच निष्कर्ष निघतो की, प्रेम आपल्या जीवनातील एकआकर्षक मोहकअसा अनुभव आहे, जो आपल्याला भरभरून जगायला प्रवृत्त करतो. प्रेमातील आपली समर्पक्ता प्रजोत्पादनाच्या दिशेने निष्ठेने प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते. इंद्रधनुष्याच्या सप्त रंगात जगणे आणि सर्व जगावरच प्रेम करणे ही कही सहज घडणारी गोष्ट नाही. तिसरा टप्पा म्हणजे संग, लळा लागणे. जेव्हा प्रेमात पडलेले असे जोडपे वरील दोन टप्पे ओलांडतात तेव्हा त्या दोघां मधील बंध घट्ट होतात. दोघांना लागलेला एकमेकांचा लळा, दोघांतील बंध त्यांना त्यांचे संबंध वरच्या स्तरावर नेण्यास मदत करतात. त्या दोघांमध्ये मुलांना जन्म देण्याची आणि त्यांना मनापासून प्रेमाने वाढवण्याची भावना उत्तेजित करते. दोघांमध्ये तयार होणारे बंध तपासताना शास्त्रज्ञांनी दोन उप-टप्पे शोधून काढले. हे दोन उपटप्पे म्हणजेशरीरात तयार होणारे 'ओक्स्सीटोसीन' आणि 'व्हॅसोप्रेसीन' हीसंप्रेरके (हार्मोन्स), जे त्या व्यक्तीच्या शरीरात त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराबरोबर प्रेमाची भावना टिक्वून ठेवण्यासाठी मदत करतात. ओक्स्सीटोसीन यालाच 'गोंजारणारा संप्रेरक ही म्हणतात, हा भावनोत्क्टतेच्या दरम्यान (समागमनाच्या क्रियेत), पुरुष आणि स्त्रियांच्या मध्ये समानपणे व सर्वात जास्त प्रमाणात स्त्रवणारा शक्तिशाली हार्मोनपैकी एक आहे. ओक्स्सीटोसीन, प्रेमाची खोली व जोडीदाराचा सहभाग वाढवतो. एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की जितके जास्त त्यांच्यातील लैंगिक संबंध वाढवतात तितकेच दोघातील बंध घट्ट होत जातात. ओक्स्सीटोसीनमानवामध्ये संलग्नता व बंध निर्माण करण्यात महत्वाची भूमिका निभावतो. तसेच ओक्स्सीटोसीन बाळाच्या जन्माच्या वेळेस माता व नवजात बाळात घट्ट बंध निर्माण करतो. हा हार्मोन इतका संवेदनशील आहे कि बाळाचा आवाज ऐकला किव्हा स्पर्श झाल्या बरोबर त्या मातेला पान्हा फुटतो. स्त्री मध्ये बाळंत होणे व स्तनात दुध निर्माण करण्यासारखी क्रिया हाच हार्मोन नियंत्रित करतो. यामुळेच आपल्याला जोडीदारासोबत संवाद करताना सूचक्मणे मिळणारे इशारे पटकन ओळखता येतात, यालाच आपण म्हणतो जोडीदाराचे मन वाचता येणे. यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयोगात ३० सशक्त स्वयंसेवकांना ज्या वेळेस ओक्स्सीटोसीन देण्यात आले तेव्हा त्यांना चटकन जोडीदाराच्या डोळ्यात बघून त्याचे भाव ओळखता आले. ओक्स्सीटोसीन दोन प्रेमिकांना जवळ आणून त्यांचातील संवाद सुधारते. 'व्हॅसोप्रेसीन' हा साधारणपणे किडनीशी संबंधित लघवी व तहान नियंत्रित करणारा होर्मोन आहे. लैंगिक क्रियेनंतर त्वरित हा होर्मोन मोठ्या प्रमाणात तयार होतो. जरी पुरुष आणि स्त्री चा मेंदू रचनात्मक दृष्ट्या भिन्न असला तरी दोन्हमध्ये पिट्युटरी ग्रंथीच हा होर्मोन तयार करते. याची समागमात आणि जोडीदार निवडीत खूप महत्वाची भूमिका असते. दीर्घकालीन संबंध टिक्वून ठेवण्यास प्रोत्साहन देणारे 'व्हॅसोप्रेसीन' हे एक महत्वाचे हार्मोन आहे. जीवशास्त्रीय मनोविज्ञान (२०१२) मधील अभ्यासात ३७ जोडप्यांमध्ये या होर्मोन्सची रक्तातील पातळी मोजून मूल्यमापन केले गेले. निष्क्यांवरून असे दिसून आले की व्हॅसोप्रेसिन पातळी विविध क्रियांमागे कार्यरत असते जसे, जोडप्यातील क्रियात्मक कामकाज उत्तमरीत्या चालते, मोठ्या प्रमाणात ते सामाजिक संपर्क प्रस्थापित करतात. दोघेही अधिक प्रमाणात जोडीदाराचे समर्थन करतात. जोडीदारासोबत अधिक सुरक्षीततेची भावना निर्माण होते. आपसातील संबंध टिकून ठेवण्याकडे कल वाढतो, दोघांमध्ये कमी प्रमाणत नकारात्मक संवाद घडतो. आत्तापर्यंतच्या चेर्चेवरून प्रेम ही आपल्या आयुष्यातील सर्वात आनंददायक भावनांपैकी एक आहे हे समजते. प्रेम आंधळे असते हे म्हणणे खरे आहे, कारण आपल्याला कधीच माहित नसते की आपला मेंदू, कधी, कुठे, कोणा बद्दल प्रेम अनुभवेल. या प्रेम प्रकरणात लाक्षणिकरीत्या वृत्तीशील असलेल्या या विविध रासायनिक घटकांचा, होर्मोनसचा प्रभाव मान्य करावाच लागतो. यांच्यामुळे मेंदूत होणारी उलथापालथ आपल्याला त्या व्यक्तीच्या प्रेमात पाडते. प्रेमाची हीसंवेदनशील प्रतिक्रिया आपण टाळूच शक्त नाही. यासाठी जोडीदार देखणा, रुबाबदार, मादक, स्मार्ट, सुंदर असण्याची काहीएक आवश्यक्ता नाही, हीभावना केवळ वरवरच्या शारीरिक दिसण्यावरून तयार होत नसून खोल आतून निर्माण झालेली असते. प्रेम हे अजब नैसर्गिक रसायन आहे. ते आपल्याला गोंधळात टाक्ते, स्वप्न बघायला लावते, त्याच्याच विचारात गुंतवते. मनुष्यास जगण्यासाठी प्रेम भावनेची आवश्यक्ता विषद करतांना शास्त्रज्ञ सांगतात कीअफिरीकन सवना सारख्या जंगलात तुम्ही एक्टे जगू शक्त नाही, तुम्ही स्वतःहून जंगलामध्ये राहू शक्त नाही. त्यामुळे क्दाचित प्रेम किंवा इतर भावनिक जोडणी आम्हाला एकमेकांप्रती चांगले असणे, काहीवेळा निःस्वार्थ वृत्ती बाळगणे आणि इतर लोकांच्या गरजा भागविण्यासाठी उपयुक्त ठरू शक्ते. मनुष्य प्रजातींची उत्क्रांती होण्यासाठी लाखो वर्षांपूर्वीच प्रेमाची निर्मिती झाली असावी. ९७ टक्के सस्तन प्राणी पिल्लांचे संगोपन करण्यासाठी जोडी बनवत नाही, पण मनुष्याच असे करतो. मनुष्यांमध्ये ४ लाख वर्षांपूर्वीच अश्याप्रकारे बंध निर्माण होण्यास सुरुवात झाली, या सोबतच त्यांच्या मेंदूत रम्य प्रेम भावनेची उत्पत्ती झाली असावी. त्याजोगे मिलनाची प्रक्रिया सुलभ होऊन आपली जनुके भाविष्यातील पिढीत पाठवणे शक्य झाले आहे. 

 (लेखक नाशिक येथे प्राणीशाख विषयाचे प्राध्यापक आहेत.) 
प्रकाशित- रविवार, ५ ऑगस्ट २०१८ समर स्वतंत्र भारत - डॉ. चेतन जावळे .९४२२७७०८६९

Wednesday, January 28, 2026

Wonderful Stories and Articles — एक मनापासून सुरुवात

 

Wonderful Stories and Articles — एक मनापासून सुरुवात ✨

नमस्कार मित्रांनो,

Wonderful Stories and Articles या माझ्या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
हा ब्लॉग म्हणजे शब्दांची, विचारांची आणि भावनांची एक छोटीशी पण प्रामाणिक दुनिया आहे.

📌 या ब्लॉगमागचा उद्देश

मराठी ही केवळ भाषा नाही, ती एक भावना आहे.
या ब्लॉगचा मुख्य उद्देश म्हणजे —

  • दर्जेदार मराठी कथा आणि लेख वाचकांपर्यंत पोहोचवणे

  • जीवनातील विविध पैलूंवर विचार करायला लावणारे लेखन सादर करणे

  • कल्पनाशक्ती, अनुभव, समाज, निसर्ग, मानसशास्त्र, संस्कृती, नाती, वास्तव आणि कल्पना —
    विविध विषयांवर आधारित लेखन एका ठिकाणी उपलब्ध करून देणे

  • नव्या पिढीला मराठी वाचनाची गोडी लावणे

येथील प्रत्येक कथा व लेख हा मनापासून लिहिलेला असेल — कोणत्याही एका चौकटीत न अडकता.

👥 हा ब्लॉग कोणासाठी आहे?

हा ब्लॉग खास —

  • कथा वाचायला आवडणाऱ्या प्रत्येकासाठी

  • मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी

  • विचार करायला, थांबायला आणि भावना समजून घ्यायला आवडणाऱ्या वाचकांसाठी

  • विद्यार्थी, शिक्षक, लेखक, कलाकार, शेतकरी, नोकरदार, गृहिणी —
    सर्व वयोगटांतील मराठी वाचकांसाठी

तुम्ही नियमित वाचक असाल किंवा योगायोगाने इथे आलात असाल —
जर तुम्हाला शब्दांशी नातं आहे, तर हा ब्लॉग तुमचाच आहे.

📖 इथे काय वाचायला मिळेल?

  • लघुकथा आणि दीर्घ कथा

  • सामाजिक, वैचारिक आणि अनुभवाधारित लेख

  • कधी गंभीर, कधी हलकेफुलके, कधी अंतर्मुख करणारे लेखन

  • वास्तव आणि कल्पनेचा सुंदर संगम

प्रत्येक पोस्टचा एकच प्रयत्न असेल —
वाचकाच्या मनाला स्पर्श करणे.

🤝 तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे

हा ब्लॉग वाढावा, अधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे.

  • कथा/लेख वाचून कॉमेंट करा

  • आवडलेली पोस्ट शेअर करा

  • ब्लॉग फॉलो/सबस्क्राइब करा

  • तुमचे विचार, मत, प्रतिक्रिया नक्की कळवा

तुमच्या एका प्रतिक्रियेमुळेही लेखकाला लिहितं राहण्याचं बळ मिळतं.


शब्दांमधून संवाद साधण्याचा हा प्रवास तुमच्यासोबत करायचा आहे.
चला तर मग, वाचनाच्या या सुंदर प्रवासाला एकत्र सुरुवात करूया…

– Wonderful Stories and Articles
✍️ लेखक

Tuesday, January 13, 2026

लापता

 

लापता

तो दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता.
सकाळची उन्हं, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चहाच्या टपरीवरचा उकळता किटलीचा आवाज, आणि गावाच्या मध्यभागी असलेला तो जुना वड—ज्याच्या सावलीखाली पिढ्यानपिढ्या चर्चा होत आल्या होत्या. फरक इतकाच होता, की त्या दिवशी चर्चेचा विषय माणसं नव्हती, तर हरवलेली मूल्यं होती.
खेडं समृद्ध होतं.
किमान कागदावर तरी.
रस्ते होते, पाट्या होत्या, योजनांची नावं होती, उद्घाटनांचे फोटो होते. पण तरीही त्या दिवशी, वर्तमानपत्राच्या चौकटीत छापलेली बातमी गावाला अस्वस्थ करून गेली—
“एक तरुण बेपत्ता. नाव – विकास.”
आणि त्याच बातमीच्या खालच्या ओळीत, जणू नकळत—
“संस्कार आणि संस्कृती या दोन तरुणीही काही काळापासून दिसेनाशा.”
कोणीही पहिल्यांदा वाचताना लक्ष दिलं नाही.
विकास हरवणं हे आता नवीन राहिलेलं नव्हतं. तो अधूनमधून हरवत असे, पुन्हा एखाद्या घोषणेत, एखाद्या जाहिरातीत, एखाद्या भाषणात सापडत असे. पण यावेळी वेगळं होतं. कारण यावेळी संस्कार आणि संस्कृतीही सोबत गायब होत्या.
संस्कार आणि संस्कृती—
सख्ख्या बहिणी.
त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शिकवलं होतं, “आपण गोंधळातही आपली ओळख विसरायची नाही.”
पण काळ असा होता, की ओळख विसरण्याला प्रगती म्हणू लागले होते.
गावातले म्हातारे सांगत.
“लहानपणी तिघंही एकत्र खेळायचे. विकास थोडासा मागे, पण कायम उत्साही. संस्कार शांत, संस्कृती जरा चंचल.”
कोणी त्यांचं नातं विचारलं, तर उत्तर धूसर मिळायचं.
नातं नव्हतं, एक सहवास होता.
एकमेकांशिवाय अपूर्ण असलेलं अस्तित्व.
पण जसजसा काळ पुढे गेला, तसतशी दृश्यं बदलू लागली.
विकास मोठा होत गेला.
पण त्याचं वाढणं विचित्र होतं. उंची वाढत होती, पण मुळं खोल जात नव्हती. त्याला अनेकांनी दत्तक घ्यायचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या पक्षांनी, वेगवेगळ्या धोरणांनी. कोणी त्याला ‘जलद’ म्हणालं, कोणी ‘सर्वसमावेशक’, कोणी ‘टिकाऊ’. पण कुणीही त्याला विचारलं नाही—
“तुला नक्की काय व्हायचं आहे?”
संस्कार आणि संस्कृती मात्र तिथेच होत्या.
थोड्या गोंधळलेल्या, थोड्या बाजूला सारलेल्या, पण अजूनही अस्तित्वात.
आमचे वार्ताहर, श्री. चिकित्सक, त्या दिवशी गावात आले.
त्यांचा चेहरा नेहमीसारखा शांत, पण डोळ्यांत प्रश्नांची गर्दी.
ते प्रत्येकाकडे गेले.
शेतकऱ्याकडे—
तो म्हणाला, “विकास? हो होता तो. पण तो कधी माझ्या शेतात टिकला नाही. दर वेळी नवं काहीतरी सांगून निघून जायचा.”
शिक्षकाकडे—
“संस्कार आणि संस्कृती? अभ्यासू होत्या. पण अभ्यासक्रम बदलत गेला, तसं त्यांचं महत्त्व कमी झालं.”
तरुणांकडे—
“आम्हाला वेग हवा होता. विचारायला वेळ नव्हता.”
आणि शेवटी, त्या वडाखाली बसलेल्या म्हाताऱ्याकडे—
तो बराच वेळ शांत होता. मग हळूच म्हणाला,
“एक गोष्ट सांगतो. जेव्हा कधी संस्कार आणि संस्कृती दिसायच्या, तेव्हा त्यांच्या मागे कुठे तरी विकास असायचा. आणि थोड्याच वेळात त्या दोघी गायब व्हायच्या.”
ही गोष्ट सगळ्यांना अस्वस्थ करून गेली.
जणू विकास, त्यांचा पाठलाग करत होता.
किंवा कदाचित, तो त्यांच्या आधारावरच उभा राहण्याचा प्रयत्न करत होता—आणि त्यातच त्यांना संपवत होता.
मिडियाला विषय मिळाला.
तासन्‌तास चर्चा झाल्या.
“नातं काय?”
“जबाबदार कोण?”
“षड्यंत्र आहे का?”
पण कुणीही हे विचारलं नाही—
आपण शेवटचं संस्कार आणि संस्कृती कधी पाहिलं?
आणि आपण तेव्हा काय केलं?
राज्यकर्ते निवेदने देत राहिले.
“चौकशी सुरू आहे.”
“लवकरच सत्य बाहेर येईल.”
“विकास आमचा प्राधान्यक्रम आहे.”
पण विकास सापडला नाही.
संस्कार आणि संस्कृतीही नाहीत.
कदाचित ते तिघे कुठेच गेले नाहीत.
कदाचित ते इथेच आहेत—
फक्त आपल्याला दिसेनासे झालेत.
कारण काही हरवत नाही,
ते फक्त दुर्लक्षित होतं.
आणि शेवटी, वर्तमानपत्राच्या कोपऱ्यात छोटीशी जाहिरात छापली गेली—
“या तिघांबद्दल काही माहिती असल्यास, कृपया मतदार बंधुभगिनींना कळवावे.”
मी ती जाहिरात वाचली.
आणि मनात एकच विचार आला—
माहिती नाही.
जबाबदारी आहे.
पण ती स्वीकारायला
आपण अजून तयार नाही.

Sunday, January 11, 2026

माणूस ओळखण्याचं सूक्ष्म शास्त्र

 

माणूस ओळखण्याचं सूक्ष्म शास्त्र

माणूस ओळखणं हे साध्या डोळ्यांचं काम नाही हो, ते तर एक जबरदस्त 'सूक्ष्म निरीक्षणाचं' शास्त्र आहे. खोटं कशाला सांगू, आज आपण दररोज अशा असंख्य नातेसंबंधांच्या गोतावळ्यात जगतो, जे वरवर पाहता लोखंडासारखे मजबूत वाटतात; पण प्रत्यक्षात ते काचेसारखे ठिसूळ असतात. विश्वासाची गोष्ट तर सोडाच, तो आता बाजारात मिळणारी दुर्मिळ वस्तू झालीय. आपण आपली मौल्यवान भावनिक ऊर्जा आणि वेळ अशा लोकांमध्ये गुंतवत असतो, ज्यांचे खरे हेतू त्यांच्या सूक्ष्म हालचालींशिवाय कधीच स्पष्ट होत नाहीत. हे संकेत समजून घेणं ही केवळ नातेसंबंध टिकवण्याची कसरत नाही, तर स्वतःच्या मनाची आणि भावनिक जागेची अखंडता जपण्यासाठी केलेली एक अनिवार्य धडपड आहे.
अहो, गंमत सांगतो, आपलं शरीर म्हणजे एक अत्याधुनिक 'भावनिक रडार' आहे. आपलं डोकं किंवा तर्कनिष्ठ मन काय चाललंय हे समजून घेण्यापूर्वीच, या शरीराला त्या विषारी लहरींची चाहूल लागते. एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीत तुम्हाला अचानक अकारण थकवा, अस्वस्थता किंवा अनामिक ताण जाणवला, तर तो योगायोग नसतो. ती तुमची नैसर्गिक 'मानसिक संरक्षण यंत्रणा' असते, जी धोक्याचा इशारा देत असते. विचार करा, एखादी व्यक्ती खोलीत शिरताच तुमचं पोट खळबळतं, श्वास उथळ होतो; जणू काही समोर एखादा शिकारी हसून पुढच्या हल्ल्याची योजना आखतोय आणि तुमचं शरीर सावध होतंय. पण मग आपलं हे तथाकथित 'सुसंस्कृत मन' मधे येतं आणि म्हणतं, "अरे, एवढं काय नाटक करतोयस? त्यांनी तर काहीच चुकीचं केलं नाही." खरं तर, समोरची व्यक्ती इतकी सूक्ष्म विषारी ऊर्जा सोडत असते की फक्त तुमचं सुप्त मनच ती पकडू शकतं. हे एखाद्या अदृश्य किरणोत्सर्गासारखं आहे—दिसत नाही, पण त्याचे परिणाम मात्र शरीराला भोगावे लागतात.
प्रसिद्ध मनोवैज्ञानिक कार्ल जुंगने एक फार मोठी गोष्ट सांगून ठेवलीय. आपली मानसिकता थरांमध्ये काम करते. वरचा थर सभ्य, तार्किक आणि सामाजिक शिष्टाचाराने वेढलेला असतो; पण आतला एक प्राचीन थर असा आहे, ज्याला समाजाच्या नियमांची पर्वा नसते. तो फक्त तुमच्या सुरक्षिततेची काळजी करतो. दुर्दैवाने, समाजाने आपल्याला या धोक्याच्या घंटांकडे दुर्लक्ष करण्यासाठी प्रशिक्षित केलंय. "लोकांना संधी द्या, समजूतदार राहा, वरवरच्या रूपावरून न्याय करू नका," हे ऐकून आपण आपली स्वतःची संरक्षण यंत्रणाच बंद करून टाकली आहे. विचार करा, स्वतःचा सभ्यपणाचा देखावा राखण्यासाठी आपण किती वेळा आपल्या अंतःप्रेरणेशी प्रतारणा करतो? या मूक विश्वासघाताची किंमत किती मोठी असेल?
मत्सर नावाचं हे विष बघा, ते समोरच्याला हळूहळू मारतं. सर्वात घातक लोक ते असतात, ज्यांनी हे विष 'स्लो पोइसनिग' डोसमध्ये देण्याची कला आत्मसात केली असते. ते तुमच्यावर थेट वार करत नाहीत. त्याऐवजी, ते अशा शब्दांचा वापर करतात जे वरवर समर्थनासारखे वाटतात, पण तुमच्या आत्मविश्वासावर ॲसिडसारखं काम करतात. तुम्ही आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं मिळवल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियेचं नीट निरीक्षण करा. "वा, घर घेतलंस? छानच आहे, पण हा हप्ता आणि देखभालीचा खर्च तुला झेपेल ना?" किंवा "बढती मिळाली? अभिनंदन! पण आता जो ताण वाढणार आहे, तो तू पेलू शकशील का?" हे खरं समर्थन नसतं; हे विषाने माखलेलं समर्थन असतं. प्रत्येक अभिनंदनासोबत एक शंकेची सावली असतेच.
जुंग म्हणतो तसं, मत्सरी व्यक्तीची सुप्त सावली इतरांच्या यशाने कधीच सुखावू शकत नाही. त्यांचं मन आतल्या आत कुजबुजत असतं, "त्यालाच का? मला का नाही?" त्यांचं यश त्यांच्यासाठी एक क्रूर आरसा असतं, ज्यात त्यांना स्वतःच्या मर्यादा दिसतात. म्हणून ते तुम्हाला सूक्ष्मपणे खाली ओढण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांना स्वतःला पुन्हा श्रेष्ठ आणि सोयीचं वाटेल. हे लोक तुमच्या जवळचे हितचिंतक म्हणून वावरतात आणि तुम्हाला येणाऱ्या संकटांबद्दल वारंवार सावध करून तुमच्या मनात असुरक्षिततेचं बी पेरतात.
आणि हे 'मॅनिपुलेटर्स'! हे तर मानसिक हिंसेचे कलाकार असतात. ते प्रेमाचा आणि काळजीचा मुखवटा घालून तुम्हाला आलिंगन देऊन तुमचा गळा घोटतात. संरक्षण देण्याच्या नावाखाली ते तुम्हाला कैद करतात. "मला फक्त तुझी काळजी वाटतेय" किंवा "तुला दुखावलेलं मला पाहायचं नाहीये," हे त्यांचं ब्रीदवाक्य असतं. पण खरी काळजी आणि नियंत्रणाचा मुखवटा यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. खरी काळजी माणसाला पंख देते, त्याला उडायला शिकवते; पण हे विषारी नियंत्रण माणसाला असुरक्षित करून दुसऱ्यावर अवलंबून ठेवतं. अशा व्यक्तीशी बोलल्यानंतर जर तुम्हाला अधिक उत्साह वाटण्याऐवजी स्वतःला छोटं आणि हतबल वाटत असेल, तर समजून जा की तिथे नियंत्रण आहे, प्रेम नाही.
काही लोक तर पडद्यामागून तुमच्या प्रतिष्ठेचा लिलाव मांडतात. ते थेट आरोप करत नाहीत, तर संभाषणातून शंकेची बी पेरतात. "तो थोडा विचित्र वागतोय असं वाटतंय ना?" किंवा "ती गोष्टी खूप फुगवून सांगते," अशा वाक्यांनी ते तुमची प्रतिमा हजारो लहान जखमांनी पोखरून टाकतात. यालाच जुंग 'सुप्त सावलीचं प्रक्षेपण' म्हणतो. ते स्वतःचे नकारात्मक गुण तुमच्यावर लादतात. या मानसिक युद्धापासून स्वतःचा बचाव करणं अशक्य असतं, कारण तुम्ही जेव्हा त्यांना जाब विचारता, तेव्हा ते स्वतःलाच 'बळी' म्हणून सादर करतात.
मानसिक हिंसेचा आणखी एक प्रकार म्हणजे सततचा आणि कठोर न्यायनिवाडा. काही माणसं न्यायाचं असं गुदमरवून टाकणारं क्षेत्र निर्माण करतात की, त्यांच्या उपस्थितीत तुमची नैसर्गिक वागणूकच हरवून बसते. जणू काही एखादा अदृश्य सेन्सर तुमच्या प्रत्येक शब्दाची नोंद करतोय असं तुम्हाला वाटतं. त्यांचे चेहऱ्याचे हावभाव तटस्थ असतात, पण त्यांचं शांत राहणं कोणत्याही ओरडण्यापेक्षा जास्त भीतीदायक असतं. अशा लोकांच्या मनात स्वतःबद्दल एक अत्यंत कठोर टीकाकार बसलेला असतो आणि तीच विनाशकारी ऊर्जा ते जगावर सोडतात. तुम्ही एका अशा मानसिक जेलरचे कैदी बनता, ज्याला तुम्ही कधीच खुश करू शकत नाही.
शेवटी, माणसाचं खरं स्वरूप कळण्याची एकच खात्रीशीर कसोटी आहे—ती म्हणजे तुमचा कठीण काळ. जेव्हा सगळं ठीक असतं, तेव्हा कुणीही मित्र होऊ शकतं; पण जेव्हा तुम्ही हतबल असता, तेव्हाच सामाजिक मुखवटे गळून पडतात. काही लोक तर 'भावनिक गिधाडां'सारखे असतात. तुम्ही संकटात असता तेव्हाच ते जवळ येतात; मदत करायला नाही, तर तुमच्या दुःखावर जगायला. तुमच्या पडझडीत त्यांना एक छुपे समाधान मिळत असतं.
मला समजलं होतं तसं तुम्हालाही समजलंय का, की हा कठीण काळ ही एक देणगी आहे? तो सत्याचा शोध घेणाऱ्या यंत्रासारखा असतो, जो खऱ्या माणसांना आणि भावनिक शोषकांना वेगळं करतो. आता तुम्ही या ज्ञानाचा वापर कसा करणार? स्वतःच्या अंतःप्रेरणेशी पुन्हा प्रतारणा करणार की या सत्याचा स्वीकार करण्याचं धैर्य दाखवणार? माणूस ओळखणं हे शेवटी एखाद्या पेंटिंगसारखं आहे—लांबून रंग दिसतात, पण जवळ गेल्यावरच ब्रशचे ओरखडे समजतात. स्वतःशी प्रामाणिक राहणं, हाच खऱ्या भावनिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे.

Saturday, January 3, 2026

लागण

 

लागण

लागण
मी खिडकीत उभा होतो, कारण मला बाहेर पाहायचं होतं म्हणून नाही, तर अंतर्मन आधीच सावध झालं होतं. जळगावची ती उन्हाळ्यातील संध्याकाळ नेहमीसारखीच असायला हवी होती. रस्त्यांवर पसरलेली उष्ण हवा, धुळीचा मंद वास, पिवळसर स्ट्रीटलाईट्स, दूर कुठेतरी स्कूटरचा आवाज, कुत्र्यांचं भुंकणं. सगळं ओळखीचं. पण तरीही काहीतरी चुकत होतं.
खिडकीतून खाली पाहिलं आणि मला ते दिसलं.
लोक,
खूप लोक.
ते मरगळल्या सारखे, पण ठरावीक पद्धतीनं चालत होते. वर्तुळात. अंडाकृती आकारात. कुठे जायचंय हे माहीत नसल्यासारखे, पण चालणं थांबवायचं नाही असा हट्ट धरल्यासारखे. कुणी बोलत नव्हतं. कुणी थांबत नव्हतं.
आणि मग मला ते मूल दिसलं.
रस्त्याच्या मधोमध पडलेलं. अगदी लहान. न हलणारं. झोपल्यासारखं. पण झोप नव्हती ती. लोक त्यावरून चालत होते. कुणी थोडं वाकून पाहिलंही नाही. कुणी थांबलं नाही.
त्या क्षणी मला कळलं.
ते लोक आजारी नव्हते.
ते घाबरलेले हि नव्हते.
ती माणसं राहिलेली नव्हती.
ती संक्रमित झालेली होती.
झोम्बी.
चित्रपटातले ओरडणारे राक्षस नाहीत. शांत, चालणारे, दिसायला माणसांसारखेच. पण आतून रिकामे.
माझ्या मागे, घरात माझे आईवडील उभे होते. तेही बघत होते. पण त्यांना काहीच कळत नव्हतं. ते म्हणत होते, ‘गरीब लोक आहेत’, ‘काहीतरी आंदोलन असावं, ’मोर्चा असावा, ‘आपण विचारूया’.
माझ्या अंगावर काटा आला.
‘त्यांना हात लावू नका,’ मी म्हणालो. ती माणसं राहिलेली नाहीत.’
ते हसले. दया वाटली त्यांना.
मग एकाने वर पाहिलं.
माझ्याकडे.
मग दुसऱ्याने.
मग सगळ्यांनी.
दारावर टकटक झाली.
हळू.
सभ्य.
वडिलांनी दार उघडलं.
ते आत आले.
त्या क्षणी माझ्या आत काहीतरी चमकले. मी हातात मिळेल ते उचलून मारायला सुरुवात केली. लाकडी काठी, लोखंडी सळई, जे मिळेल ते. ते रडत नव्हते. ओरडत नव्हते. फक्त पुढे येत होते.
वेळ थांबली होती.
माझे हात थकले.
माझा श्वास तुटत होता.
पण मी थांबलो नाही.
मागच्या दारातून ते पुन्हा आले.
मागे आग लागली.
जळत असतानाही ते चालत होते.
मी त्यांना ढकलत राहिलो.
आणि मग आकाशातून चमत्कारिक वस्तू पडली.
ते थांबले.
कोसळले, निपचित झाले.
शांतता.
मी जमिनीवर बसलो.
आणि जागा झालो.
घामेजलेला.
दमलेला.
"ते फक्त एक स्वप्न होतं... पण त्या एका स्वप्नाने माझ्यातलं सगळं काही बदलून टाकलं.
मला उमजलं की, खरी लागण कोणात्या विषाणूमुळे किंवा दातांनी चावा घेतल्यामुळे लागत नाही; ती लागण होते आपल्या 'दुर्लक्ष' करण्यामुळे. जेव्हा आपण समाज म्हणून चुकीच्या गोष्टींकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतो, तेव्हा हा रोग पसरतो, पाप पुण्य व पुण्य पाप वाटायला लागते.
घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, घर म्हणजे एक 'मर्यादा' असते; आणि प्रत्येकालाच ती सीमा मान्य नसते, ती लक्ख डोळे उघडे ठेऊन ओलांडावी लागेल, वास्तवात कोणता चमत्कार होणार नसतो.
मी आता पूर्णपणे जागा झालोय. झोम्बींच्या भीतीने नाही, तर माझ्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून. मी पुन्हा इतरांसारखा 'जिवंत प्रेत' होऊ नये, इतकीच धडपड आहे."

'प्रेमा' मागचे विज्ञान

'प्रेमा' मागचे विज्ञान सायकोफार्माकोलॉजी (२०१२) च्या एका संदर्भ ग्रंथात जेव्हा सामाजिक साहचर्यासोबत वागणूकीचा अभ्यास केला तेव्हा अस...